ताज्या घडामोडी:रानभाजी महोत्सव २०२६   |   एकदिवसीय परिषद – गोवा आदिवासी दृष्टीकोन २०३७   |   वन हक्क कायदा (FRA), २००६ वर एकदिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिर आणि SDLC बैठका.   |   आदिवासी हस्तकला प्रदर्शन   |   जनजाती मंथन शिबीर आणि जनजागृती कार्यक्रम

राष्ट्रीय आदिवासी पथनाट्य महोत्सव तसेच नाटक महोत्सव

Date

23 Mar, 2026 - 23 Nov, 2026

11 जुलै 2025 रोजी मडगावच्या रवींद्र भवन येथे राज्यस्तरीय ‘आदियुवा पथनाट्य महोत्सव’ आयोजित करण्यात आला होता. आदिवासी कल्याण संचालनालयाच्या “टीआरआय सहाय्य” योजने अंतर्गत सहकार्याने गोव्यात आदिवासी संशोधन संस्थेने या पथनाट्य स्पर्धेचे आयोजन केले होते. भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या उद्घाटन समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून मडगावचे आमदार दिगंबर कामत उपस्थित होते. यावेळी आदिवासी कल्याण संचालक श्री. दीपक देसाई, गोव्याच्या आदिवासी संशोधन संस्थेचे संचालक सागर गावडे उपस्थित होते.

कार्मेल महाविद्यालयाला प्रथम पारितोषिक तर शिरोडा येथील गोमंतक आयुर्वेद महाविद्यालयाला द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले. तिसरे पारितोषिक सरकारी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय , केपे यांना प्राप्त झाले. तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक सरकारी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय खांडोळा यांना प्राप्त झाले.

या स्पर्धेचे परीक्षण श्री. सुशांत नायक, श्री. दीपेश प्रियोळकर आणि श्री. देविदास गांवकर यांनी केले.

राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील अदियुवा पथनाट्य स्पर्धेचे विषय खालीलप्रमाणे होतेः

  1. वन हक्क अधिनियम, 2006
  1. आदिवासी समुदाय : काल, आज आणि उद्या
  2. आदिवासी संस्कृती : संरक्षण आणि प्रासंगिकता.
  3. जन जतिया गौरव वर्ष
अनुक्रमणिका
इतरांसोबत शेअर करा

हा तपशील तुमच्या नेटवर्कसह शेअर करा.