लोकोत्सव 2022- 22वा वार्षिक पारंपरिक आदिवासी उत्सव
आदर्श युवा संघाने, समाजातील दुर्बल घटकांच्या, विशेषतः अनुसूचित जमाती समुदायाच्या उन्नतीसाठी संकल्पित केलेल्या’लोकोत्सव’या उत्सवाची 22 वर्षे साजरी केली. भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि पारंपरिक खेळांचे पुनरुज्जीवन आणि जतन करणे हे लोकोत्सव 2022 चे उद्दिष्ट आहे. आदर्श युवा संघाने आदर्श ग्राम, आमोणा, पैंगिण, काणकोण गोवा येथे बिरसा मुंडा क्रीडा महोत्सव 2022 चे आयोजन केले होते, ज्याला प्रचंड यश मिळाले आणि संपूर्ण भारतातून 2 लाखांहून अधिक लोकांनी त्याला उपस्थिती लावली. बिरसामुंडा क्रीडा महोत्सवाची पहिली आवृत्ती आदर्श ग्राम आमोणा, पैंगिण, काणकोण गोवा येथे 9, 10 आणि 11 डिसेंबर 2022 ला नियोजित करण्यात आली होती. या क्रीडा स्पर्धेत राज्यस्तरीय कबड्डी, व्हॉलीबॉल, खो-खो, मॅरेथॉन शर्यत, बॅडमिंटन आणि पारंपरिक खेळ असे विविध खेळ खेळले गेले. या क्रीडा महोत्सवात खो-खो-288 खेळाडू, व्हॉली बॉल-800 खेळाडू, बॅडमिंटन-120 खेळाडू आणि कबड्डी-280 खेळाडूंसह 2200 हून अधिक खेळाडूंनी विविध खेळांमध्ये भाग घेतला. विविध खेळांच्या 120 अधिकार्यांसह संपूर्ण गोव्यातील तसेच भारतातील 400 मॅरेथॉन शर्यतीतील खेळाडू होते. बिरसामुंडा महोत्सवाला विविध तालुका, शाळा, क्लब, संघटना इत्यादींची मदत मिळते. बिरसामुंडा क्रीडा महोत्सव 2022चे उद्घाटन गोव्याचे माननीय राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई यांनी मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत, सभापती रमेश तवडकर, आमदार, स्थानिक नेते आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत केले.
गोव्याचे माननीय राज्यपाल श्री.पी.एस. श्रीधरन पिल्लई यांनी क्रीडा महोत्सवाचा ध्वज फडकवला आणि क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन केले. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत, गोवा विधानसभेचे सभापती श्री.रमेश तवडकर, नावेलीचे आमदार श्री.उल्हास तुयेकर, कुंभारजुवेचे आमदार श्री.राजेश फळदेसाई, गोवा भाजप अध्यक्ष श्री.सदानंद तानावडे काणकोण नगरपालिका अध्यक्ष रमाकांत नाईक गावकर, श्रीमती सविता तवडकर, पैगिंणच्या सरपंचा आणि इतर मान्यवर बिरसा मुंडा क्रीडा महोत्सव 2022 च्या उद्घाटन समारंभाला उपस्थित होते.
छायाचित्र आनी व्हिडिओ गॅलरी




