गोव्यातील दोन जिल्ह्यांमध्ये गोवा-कृती संशोधन प्रस्तावाचे आदिवासी खाद्यपदार्थांचा पुनर्शोध
आदिवासी व्यवहार मंत्रालय, नवी दिल्ली यांनी गोवा राज्यासाठी वर्ष 2020-21 मध्ये “गोव्याच्या दोन जिल्ह्यांमध्ये गोवा-कृती संशोधन प्रस्तावाच्या आदिवासी पाककृतीचा पुनर्शोध” या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. सदर प्रकल्पाच्या अंमलबजावणीचे कार्य सरकारी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, केपे-गोवा यांना देण्यात आले.
या अभ्यासाचा उद्देश गोव्यात स्थानिक आदिवासी पाककृती आणि संबंधित ज्ञान ओळखणे, संकलित करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे असा आहे. आदिवासींच्या पारंपरिक पाककृतींचे दस्तऐवजीकरण करणे आणि राज्य पाककृती पुस्तिका प्रकाशित करणे हा या अभ्यासाचा मुख्य उद्देश आहे. या अभ्यासाचा मुख्य परिणाम म्हणजे गोवा राज्य आदिवासी पाककृती पुस्तिकेचे प्रकाशन आणि गोव्यात आदिवासी खाद्य पाककृती लोकप्रिय करणे.
या प्रकल्पाची उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेतः
उत्तर आणि दक्षिण गोव्यातील आदिवासी समुदायातील अद्वितीय खाद्य पाककृती ओळखणे.उत्तर आणि दक्षिण गोव्यातील आदिवासी समुदायांच्या राज्य पाककृती पुस्तिकेचे कॅटलॉग आणि प्रकाशन करणे.भौगोलिक स्थान शोधणे आणि गोव्याच्या आदिवासींकडून ज्ञान प्राप्त करणे आणि मोठ्या प्रमाणात लोकसंख्येचे आरोग्य आणि कल्याणासाठी खाद्य आधारित हस्तक्षेप तयार करणे.आदिवासीबद्दचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी सामान्यतः सोशल मीडियाच्या माध्यमातून आदिवासी खाद्यपदार्थांच्या पाककृती लोकप्रिय करणे.आदिवासी पाककृती: http://tribalcuisinegoa.in/



